'त्या' ग्रुपची अ‍ॅडमिन दीपिकाच होती, रकुल प्रीत सिंहने एनसीबी चौकशीत केला खुलासा

एनसीबीकडून आज रकुल प्रीत सिंहची चौकशी करण्यात आली असून, ड्रग्सच्या ग्रुपची अ‍ॅडमिन दीपिका होती असा खुलासा रकुलने केला आहे.

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपुत मृत्यू प्रकरणी एनसीबीने ड्रग्स प्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक केली होती. त्यानंतर रियाने अनेक दिग्गज अभिनेत्र्यांची नावे ड्रग्स प्रकरणात उघड केली आहे. त्यात दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह अशा दिग्गज अभिनेत्र्यांचा समावेश आहे. आज ड्रग्स प्रकरणात रकुल प्रीत सिंह हिची एनसीबीकडून तब्बल तीन तास चौकशी करण्यात आली त्यात रकुलनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील ड्रग्सच्या ग्रुपची दीपिकाच अ‍ॅडमिन होती अशी माहिती रकुलने एनसीबी चौकशीत आज केली आहे. त्यानंतर आता रविवारी दीपिका पादुकोणची एनसीबीकडून चौकशी होणार आहे.

दरम्यान, रकुल प्रीत सिंह एनसीबी चौकशीला येण्यास गुरुवारी टाळाटाळ करीत होती. एनसीबीकडून मला समन्स पाठवण्यात आले नसल्याचं तिने स्पष्ट केलं होतं. त्यानंतर एनसीबीने तिला तिचा राहता पत्ता विचारून गुरूवारी पुन्हा समन्स पाठवला होता. त्यानंतर रकुल मुंबईसाठी रवाना झाली होती. आज तिची एनसीबीकडून चार तीस चौकशी करण्यात आली असून, तिने दीपिका पादुकोण संदर्भात आड मोठा खुलासा केला आहे.  AM News Developed by Kalavati Technologies