दीपिका पदुकोणने शेअर केला '83' मधील First Look

दीपिका पदुकोणने तिच्या इन्स्टाग्रामवर रोमी भाटिया यांच्या भूमिकेतील तिचा फोटो शेअर केला आहे.

मुंबई | कपील देव यांच्या जीवनावर आधारित '83' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटामधून माजी क्रिकेटपटू कपील देव यांची भूमिका रणवीर कपूर साकारत आहेत. तर त्यांच्या पत्नी यांची पत्नी रोमी भाटिया यांच्या भूमिकेत दीपिका पदुकोण आहे. कबीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. '83' सिनेमाच्या निमित्तानं रणवीर आणि दीपिका चौथ्यांदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

दीपिका पदुकोणने तिच्या इन्स्टाग्रामवर रोमी भाटिया यांच्या भूमिकेतील तिचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'क्रीडा क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण मानल्या जाणाऱ्या ‘83’ सिनेमामध्ये एक लहानशी भूमिका साकारायला मिळणं हा खरं तर माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. एका यशस्वी पुरूष व्यावसायिक आणि व्यक्तीगत आयुष्यात त्यांच्या पत्नीची किती मोठा वाटा असतो हे मी माझ्या आईमध्ये पाहिलंय. माझी 83 मधील ही भूमिका आपल्या पतीच्या स्वप्नासाठी झटणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या मानातील भावना आहे.'

यामध्ये दीपिका आणि रणवीरचा लूक कपील देव आणि त्यांची पत्नी रोमी भाटियासारखाच आहे. दीपिका या सिनेमात रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारत आहे. यामुळे तिचा फर्स्ट लुक कसा असेल याची सर्वांना उत्सुकता होती. या फोटोमध्ये दीपिका शॉर्ट हेअर फुलनेक ब्लॅक टीशर्टमध्ये दिसत आहे. तिनं रणवीरचा हात पकडला आहे. 1983 मधील भारतीय क्रिकेट संघानं साकारलेल्या ऐतिहासिक विजयावर आधारित असलेला '83' हा सिनेमा 10 एप्रिल 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.AM News Developed by Kalavati Technologies