अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा; मुंबईकरांना प्रत्येकी 10 हजारांची मदत करा - आमदार अतुल भातखळकर

मुंबईकरांना सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी; यासाठी आ.भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मदतीची मागणी केली आहे

मुंबई । गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती जाहीर करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मुंबईकरांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची आर्थिक मदत सरकराने करावी; अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईत एकप्रकारचा वादळ आलेला आहे. असे म्हटले आहे. अवघ्या 12 तासात मुंबईमध्ये 294 मिमी इतका पाऊस झाला, याचाच अर्थ ही नैसर्गिक आपत्ती आहे. दरवर्षी मुंबईत पाणी तुंबते. मात्र यावर्षी परिस्थिती जरा वेगळी असून, ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि त्यामुळे या दोन दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती जाहीर करून मुंबईकरांना मदत करा, अशी मागणी आमदार भातखळकर यांनी केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies