जळगाव | दरड कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

शासकीय बर्डीवर गळ काढण्यासाठी गेलेले असताना हा अपघात झाला.

जळगाव | निंभोरासिम येथे दरड कोसळून दोन मजुरांचा जागेवरच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. शासकीय बर्डीवर गळ काढण्यासाठी गेलेले असताना हा अपघात झाला. दीपक सवर्णे वय 20, सुषानंद सोपन पाटील वय 22 ही मृतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस या ठिकाणी दाखल झाले. जखमीला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मजुरांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies