धक्कादायक! अंत्यसंस्कारासाठी चक्क रिक्षातून आणला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह

कोरोना संक्रमित रुग्णांनंतर आता मृतदेहांचीही परवड

नवी दिल्ली | देशभरात कोरोना संक्रमणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या आजाराने होणाऱ्या मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. अनेकांना या आजारानं ग्रासलं आहे. कोरोनाला लगाम लावण्यासाठी देशातील आरोग्य यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र असं असलं तरी दुसरीकडे, कोरोना संसर्गाच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्काराबद्दल सतत दुर्लक्ष केले जात आहे. अशीच एक धक्कादायक घटना तेलंगणाच्या निजामाबाद शहरातून समोर आली आहे. कोरोना संक्रमित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह ऑटो रिक्षाने स्मशानभूमीत नेण्यात आला आहे.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वास्ताविक बघता कोरोना संक्रमित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेने थेट श्मशानभुमीत नेण्यात येतो, सोबत पीपीई किट घातलेले, दोन ते तीन वार्डबॉय असतात. मृताचे शरीर प्लाष्टीकमध्ये पॅक केलेला असतो. मात्र वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने मृतदेहांचीही परवड होतांना दिसत आहे. मात्र रिक्षात नेण्यात आलेल्या या मृतदेह दोन्ही बाजूने बाहेर आला असल्याचं दिसत आहे. अशा परिस्थितीत पीपीई किट तर सोडाच पण ऑटो चालकाने व्यवस्थित मास्क पण घातलेला दिसत नाही.

तेलंगणामधील या प्रकाराने सर्वानांच हादरवून टाकले आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाला विचारणा केली असता रुग्णालयात एकाच वेळी तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता, त्यामुळं रुग्णवाहिका दुसऱ्या मृतदेहांना घेऊन गेल्या असल्यानं सदरील व्यक्तीच्या मृतदेहाला ऑटोमध्ये पाठवावे लागले असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता जिल्हाधिकारी सी नारायण रेड्डी चौकशीचे आदेश दिले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies