सावधान देशात धोका वाढतोय! गेल्या 24 तासात 83 हजार जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 लाखांच्या पार

देशात गेल्या 24 तासात 83 हजार 809 जणांना कोरोनाची लागण झाली झाली असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 लाखांच्या पुढे गेला आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनत चालला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशात सुमारे 50 लाख लोकांना ग्रासलं आहे. तर सुमारे 80 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत सुमारे 38 लाख जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

केंद्रिय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 83 हजार 809 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1 हजार 54 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 49 लाख 30 हजार 237 एवढा झाला आहे. सध्या देशात 9 लाख 90 हजार 61 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आत्तापर्यंत सुमारे 83 हजार 809 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत सुमारे 38 लाख 59 हजार 400 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, कोरोना या भयावह विषाणूनं जगभरात सुमारे 200 पेक्षा जास्त देशांमध्ये हाहाकार माजवला आहे. जगभरात सुमारे 2 कोटी 91 लाख जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 9 लाख 27 हजार जणांचा कोरोनाने जीव घेतला आहे. तर सुमारे 1 कोटी 97 लाख जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies