जळगाव जिल्ह्यात पावसामुळे कापूस, तीळ पिकांचे नुकसान

श्रावण महिन्यातील आरंभापासूनच जळगाव जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे


जळगाव | श्रावण महिन्यातील आरंभापासूनच जळगाव जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचल्याने कापूस तीळ यासारख्या पिकांचे नुकसान झाले आहे.

श्रावण महिन्याच्या प्रारंभापासूनच जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे. या पावसाचा फायदा इतर पिकांना झाला असला तरी कापूस व तीळ या पिकांचे मात्र अति पावसामुळे नुकसान झाले आहे. कापूस या पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने या पिकाची पानं करपली असून यातून उत्पन्नाची टक्केवारी घटणार आहे. तसेच तीळ हे पीक पूर्णपणे नष्ट झाले असून शेतात साचलेल्या पाण्यामुळे तीळ या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.AM News Developed by Kalavati Technologies