कुर्ल्यामधील मेहता इमारतीला लागलेली भीषण आग आटोक्यात, सुदैवाने जीवितहानी नाही

अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते.

मुंबई | कुर्ला पश्चिमेतील एस.जी.बर्वे मार्गावर असलेल्या मेहता इमारतीला लागलेली आग अखेर नियंत्रणात आली आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास ही आग लागली होती. यानंतर अग्निशमन दलाने 10 वाजल्यापासून आग शमवण्याचे काम सुरू केले. अखेर रात्री दीडच्या सुमारास आग नियंत्रणात आली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते.

इमारतीमधून स्फोटाचे आवाज येत होते. यामुळे रहिवाशांच्या सीलिंडरचा स्फोट झाल्याच शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.AM News Developed by Kalavati Technologies