VIRAL: सुसाट कारने ट्रॅक्टरला दिली जोरदार धडक, ट्रॅक्टरचे झाले जागीच दोन तुकडे पाहा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर ट्रॅक्टरच्या अपघाताचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

मुंबई । आपल्या देशात रोजच अपघात होत असतात. कधी रस्त्यावरून तर ड्रायव्हरच्या चुकीमुळे तर कधी ट्रॅफिकचे नियम मोडतांना. असाच एक अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कदाचित हा व्हिडीओ तुमच्याही मोबाईलमध्ये आला असेल. लहानशा गल्लीतून मोठ्या कौशल्यानं एक ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर मुख्य रस्त्यापर्यंत आणतो. तितक्यात समोरून येणाऱ्या भरधाव कारने ट्रॅक्टरला धडक दिली आहे. या भयावह अपघातात ट्रॅक्टर चालक अगदी थोडक्यात बचावला आहे. मात्र ट्रॅक्टरचा समोरच्या भागाने पुर्णत: दोन तुकडे झाले आहे. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies