लॉकडाऊनच्या काळात गुन्हेगारी वाढली

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी अनेक जण वळाले गुन्हेगारीकडे

मुुंबई ।  मागील 3 महिन्यांपासून कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्याने सामान्य नागरिकांना मोठी आर्थिक चणचण सहन करावी लागत आहे. या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी काही जण आता गुन्हेगारी मार्ग अवलंबत असल्याचे चित्र समोर येत आहे. वाशी पोलिसांनी अशाच एका आरोपीला अटक केले आहे. आरोपी अमित सकपाळ याचे एक मॉलमध्ये पुस्तकाचे दुकान होते. परंतु मागील 3 महिने लॉकडाऊन असल्याने दुकान बंद होते व त्यामुळे मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली होती. ही आर्थिक तंबी दूर करण्यासाठी आरोपी अमितने बाईक व ऑटोरिक्षा चोरी करण्यास सुरुवात केली.

लॉकडाऊनमध्ये होणाऱ्या वाहन चोरीमूळे पोलिसांसमोर देखील आरोपीला पकडण्याचे आव्हान निर्माण झाले होते. अशा वेळी वाशी पोलिसांनी एक विशेष पथकाची स्थापना करत तब्बल 200 सीसीटीव्हीची तपासणी करत आरोपी अमितच्या मुसक्या आवळल्या. आरोपी अमितची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना देखील लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक तंगीमुळे आरोपी वाहन चोरीच्या गुन्हेगारीकडे वळला असल्याची प्रतिक्रिया उपायुक्त पंकज डहाणे यांनी व्यक्त केली.



AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: