चंद्रपूरात कापूस खरेदी केंद्र बंद, संतप्त शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन

बाजार समिती आणि CCI कापूस खरेदी करत नसल्याने जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत.

चंद्रपूर | बाजार समिती आणि CCI कापूस खरेदी करत नसल्याने जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटात कापसाला योग्य तो भाव मिळत नाहीये. तर दुसरीकडं कापूस खरेदीकडे व्यापारी वर्गांनी पाठ फिरवली असल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील सोनूर्ली येथील खरेदी केंद्रावर कापूस खरेदीबाबत चाललेला मनमानी कारभार शेतकऱ्यांनी आंदोलन करत उघड केला आहे. हजारो क्विंटल कापूस गाड्यांसह शेतकरी या केंद्रावर खोळंबले असून या केंद्रावर खरेदी बंद झाल्याची माहिती अचानक दिल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. तेलंगणात जाणारा महामार्ग रोखून धरत हे आंदोलन केले गेले असुन आंदोलनामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तत्काळ कापूस खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies