सावधान! हवेतूनही होतोय कोरोनाचा प्रसार; अखेर WHO नेही केलं मान्य

कोरोनाचा प्रसार हवेतून होत असल्याचा दावा 32 देशातील 239 वैज्ञानिकांनी केला होता.

नवी दिल्ली | जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जीवघेण्या कोरोनाचा विषाणू हवेतून पसरत होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं मान्य केलं आहे. याबाबत पुरावे मिळाले असल्याचा दावा 32 देशांतील 239 वैज्ञानिकांनी केला होता. या दाव्यात त्यांनी असं म्हंटल होत की, कोरोना हा विषाणू हवेतील सूक्ष्म कणांत मिसळून पसरतो, तसंच शिंका व कफाच्या कणातून सुद्धा मोठ्या प्रमाणात पसरतो, जगात संसर्गाची ठिकाणे वाढत असून लोक बार, रेस्तराँ, कार्यालये, बाजारपेठा, कॅसिनो येथे जाऊ लागल्याने त्याचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. घरे, कार्यालये या सारख्या बंदिस्त जागातील हवेत हा विषाणू फिरत राहतो तसेच आजूबाजूच्या लोकांना बाधित करतो असे वैज्ञानिकांच्या आताच्या दाव्यात म्हंटल होतं.

वैज्ञानिकांनी केलेल्या या दाव्यावर आता जागतिक आरोग्य संघटनेनंही मान्य केलं आहे. डब्ल्यूएचओ संक्रमणास प्रतिबंध आणि नियंत्रणाचे नेतृत्व करणारे बेनेड्टा अ‍ॅलिग्रान्झी यांनी देखील कबूल केले आहे की हवेत कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे पुरावे आहेत परंतु ते निश्चित नाही. ते म्हणाले की, सार्वजनिक ठिकाणी वायूजनित संक्रमण पसरण्याची शक्यता आहे परंतु त्यांचे वर्णन केले जाऊ शकते, त्यांना आळा घालता येणार नाही. याकरिता प्रत्येकाने आपआपली काळजी घेऊन मास्कचा वापर करणं आपल्या जीवनाचा एक भाग बनवलं पाहिजे.

वैज्ञानिक जोस जिमेनेझ म्हणतात की यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल, जर लोक हवेत संसर्ग झाल्याचे ऐकले तर आरोग्य कर्मचारी रुग्णालयात येण्यास घाबरतील. जागतिक आरोग्य संघटनेच्या मारिया व्हॅन यांनी असं म्हंटल आहे की येत्या काही दिवसांत जागतिक आरोग्य संघटना लवकरच विषाणूच्या संसर्गाचा सविस्तर अहवाल जारी करेल. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हस्तक्षेपांचे विस्तृत पॅकेज आवश्यक असेल. यात केवळ सोशल डिस्टेंसिंगच नाही, तर प्रत्येकाला मास्कचा वापर किती महत्वाचा असणार आहे याबाबतही माहिती देण्यात येईल.AM News Developed by Kalavati Technologies