नागपूरात कोरोनाचा कहर; गेल्या 24 तासात 1126 जणांना कोरोनाची लागण, तर 44 जणांचा मृत्यू

नागपुरात सध्या 15,937 जणांवर उपचार सुरु असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 71,616 एवढा झाला आहे

नागपूर । नागपूरात कोरोना कहर सुरूच आहे. गेल्या 24 तासात 1126 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 44 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 71 हजार 616 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 15 हजार 937 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे 2 हजार 261 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 53 हजार 418 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आज आढळलेल्या 1126 रुग्णांपैकी ग्रामीण भागातील 300 तर शहरी भागतील 817 जणांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या हा आता नागपूरकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.



AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: