पनवेलमध्ये कोरोनाचा कहर सुरुच; दिवसभरात 143 नव्या रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू

पनवेलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे.

पनवेल | पनवेलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. आज 145 नव्या रुग्णांची भर पडल्यानं कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2 हजार 858 झाली आहे. तर दिवसभरात एका जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनामुळं मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 83 वर गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 48 रुग्ण कोरोना आजारापासून बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आतापर्यंत पनवेलमध्ये 1 हजार 629 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीला 1 हजार 146 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies