औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजारांच्या पार, दुपारनंतर आढळले 43 रुग्ण

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; पॉझिटिव्ह रुग्णांची संंख्या 6 हजारांच्या पार

औरंगाबाद | जिल्ह्यात कोरोना व्हायरसचे थैमान काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आज सकाळी जिल्ह्यात 206 कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यानंतर दुपारी पुन्हा 43 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये 21 पुरूष, 22 महिला आहेत. त्यामुळं जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 6 हजार 031 झाली असून 2857 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 271 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2903 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (3)

राहुल नगर (2), जय भवानी नगर (1)

ग्रामीण भागातील रुग्ण (40)

करमाड (1), चिंचबन कॉलनी, बजाज नगर (3), छत्रपती नगर, बजाज नगर (2), द्वारकानगरी, बजाज नगर (1), वडगाव कोल्हाटी (2), इंदिरा नगर,पंढरपूर, बजाज नगर (2), खंडोबा मंदिर, बजाज नगर (1), गाडगेबाबा गेट, बजाज नगर (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (6), सिंहगड सो., बजाज नगर (3), क्रांती नगर, तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर (4), वडगाव, बजाज नगर (4), रांजणगाव, बजाज नगर (1), स्नेहांकित सो., बजाज नगर (1), साऊथ सिटी, बजाज नगर (3), सिडको, बजाज नगर (1), दक्ष‍िणमुखी हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (4) या भागातील कोरोनाबाधित आहेत.AM News Developed by Kalavati Technologies