Corona Updates; यवतमाळमध्ये कोरोनाचा पहिला बळी

एका महिलेचा कोरोनामुळं मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते आहे.

यवतमाळ | जिल्ह्यात कोरोना व्हायरसने पहिला बळी घेतला आहे. एका महिलेचा कोरोनामुळं मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते आहे. मृत झालेल्या महिलेच्या प्रकृतीवर सुरूवातीपासून डॉक्टरांचे काळजीपूर्वक लक्ष होते. मात्र मध्यरात्री या महिलेची प्रकृती अचानक खालवल्यानं अखेर या महिलेचा मृत्यू झाला झाला आहे. श्वसनास त्रास होऊ लागल्यानं या महिलेचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती डॉक्टरांनी दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 125 वर पोहचली असून यातील 99 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मात्र शनिवारी कोरोनाबाधित महिलेचा अचानक मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies