कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चाललीय, सरकारने तातडीने दखल घ्यायला हवी - देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी कल्याण डोंबिवलीतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला

कल्याण | कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज कल्याण मधील हॉली क्रॉस हॉस्पिटलमध्ये बैठक घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी पालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपायोजनाबाबत माहिती दिली. कल्याण डोंबिवली मधील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत असल्याने सरकारने याची तातडीने दखल घेणे आवश्यक असल्याचं फडणवीसांनी म्हंटल आहे.

कल्याण डोंबिवली मधील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत असताना सरकाने याची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. शहरातील रुग्णसंख्या ज्या वेगाने वाढत आहे त्यामुळे सुविधा कमी पडत असून आयसीयू सह आयसोलेशन ची सुविधा वाढविणे गरजेचे आहे मात्र यासाठी राज्य शासनाकडून तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करीन देणे गरजेचे आहे. एकीकडे सोयीसुविधा कमी पडत असताना आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता हा मुद्दा देखील महत्वाचा असून इतर ठिकाणाहून आरोग्य कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून घ्यावेत किंवा नव्याने भरती करावी, स्वब टेस्टिंग चा अहवाल येण्यास होत असलेला विलंब घातक असून 24 तासात अहवाल मिळावा यासाठी नियोजन होणे गरजेचे आहे म्हणूनच राज्य सरकारने यात तातडीने लक्ष घालावे अशी आमची मागणी असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

शहरातील रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्यामुळे सुविधा कमी पडत असून आयसीयू सह आयसोलेशन ची सुविधा वाढविणे गरजेचे असल्याने यासाठी राज्य शासनाकडून तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जावी. त्याचबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भेडसावत असल्याने इतर ठिकाणाहून आरोग्य कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात उपलबंध करून घ्यावेत किंवा नव्याने भरती करावी, स्वब टेस्टिंग चा अहवाल येण्यास होत असलेला विलंब घातक असून 24 तासात अहवाल मिळावा यासाठी नियोजन केले जावे म्हणूनच राज्य सरकारने यात तातडीने लक्ष घालावे अशी आमची मागणी असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल आहे.

तर कल्याण डोंबिवली महापालिकेतून 27 गावे वगळण्याचा मागणिबाबत सरकारने 27 मधील 18 गावे वगळली व त्यांची स्वतंत्र नगरपरिषद केली तर 9 गावे पालिकेतच ठेवली याबाबत विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळलेल्या 18 नव्हे तर 27 गावाची स्वतंत्र नगरपालिका करणे गरजेचे आहे मात्र एवढेच नव्हे तर या नगरपालिकेचा प्लॅन विकसित करून त्याच्या अमलबजावणीसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे . या नगरपालिकेत सेवा सुविधा उपलब्ध न झाल्यास या गावाचा विकास न होता त्याचे डिझास्टर होईल अशी प्रतिक्रिया 18 गांवांच्या नगरपरिषदेबाबत मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies