कोरोनाची तपासणी किट बनवण्यात 'या' मराठमोळ्या रणरागिनीचा सिंहाचा वाटा

फक्त दोन ते अडीज तासात होईल कोरोनाचं निदान

पुणे | जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जगात ठिकठिकाणी कोरोनाबाबत लस, किट, तयार करण्याचे काम चालू आहे. अद्यापही कोरोना व्हायरस बाबत कोणतीही लस, औषध बनवण्यात यश आले नाही. मात्र कोरोनाची बाधित रुग्णांची लवकर पुष्टी झाली तर कोरोना व्हायरसला आळा घालता येऊ शकतो. हीच बाब लक्षात घेऊन पुण्यातील रिसर्च डिपार्टमेंटच्या मराठमोळ्या डॉक्टर मीनल दाखवे भोसले यांनी एक किट तयार केली आहे. या किटवरून रुग्ण कोरोना बाधित आहे की नाही याची पुष्टी होणार आहे.

महत्वाची बाब म्हणजे फक्त दोन ते अडीज तासांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची पुष्टी होणार आहे. मायलॅबकडून ही किट बाजारात आणल्या गेली आहे. या किटला पॅथो किट असे नाव देण्यात आले आहे. ह्या किटची निर्मिती करण्यासाठी 6 आठवड्याचा कालावधी लागला आहे. पुण्यातील विषाणूतज्ज्ञ डॉक्टर मीनल दाखवे भोसले यांच्या नेतृत्वाखाली ह्या किटची निर्मीती करण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies