मोठी बातमी | नांदेडमध्ये 12 जुलै ते 20 जुलैदरम्यान कडक लॉकडाऊन; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद

अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं पुर्णत: बंद राहणार आहे

नांदेड | शहरात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव बघता 12 जुलै मध्यरात्रीपासून ते 20 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत शहरात कडक संचारबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी एका बैठकीत हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून नांदेड शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळं औरंगाबाद प्रमाणे कडक लॉकडाऊन केल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील.

भाजीपाला आणि किराणा तसेच बँक व इतर देखील कडकडीत बंद ठेवा, फक्त मेडिकल व दवाखाने सुरू ठेवा. दूध आणि पेपरसाठी सकाळी 6 ते 8 अशी वेळ द्या. एकदाच लॉकडाऊन करा. पण कडकडीत करा. अशी मागणी नागरिकांनी व व्यापाऱ्यांची केली होती. त्यांच्या या मागणीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आता नांदेड संपुर्ण लॉकडाऊन करण्याच निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असं त्यांनी म्हंटल आहे. AM News Developed by Kalavati Technologies