आता कोरोना विषाणूपासून बचाव करेल 'गळ्यातील हार', नासाने तयार केला अनोखा नेकलेस

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नासाने तयार केला एक अनोखा नेकलेस

नवी दिल्ली | कोरोना विषाणूमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या संसर्गामुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे तर संक्रमितांची संख्या सतत वाढत आहे. बर्‍याच कंपन्यांनी कोरोनावर लस बनवल्याचा दावा केला आहे, परंतु अद्यापपर्यंत त्यांना पूर्णपणे यश आले नाही. दरम्यान, अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासानेही एक अनोखा हार तयार केला आहे, नासाकडून दावा केला जात आहे की हा अनोखा हार कोरोना संक्रमणापासून संरक्षण करेल. या हाराला 'पल्स' असे नाव देण्यात आले आहे. नेमका हा हार कोरोना विषाणूपासून आपले कसे संरक्षण करेल? ते जाणून घेऊया...

कसे होते कोरोना विषाणूपासून संरक्षण?

कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी आपल्याला हे माहित असेल की साबन आणि सॅनिटाईझरने वारंवार हात धुतले पाहिजे. तसेच तोंडाला, नाकाला आणि डोळ्यांना स्पर्श करु नये, जर असे केल्यास कोरोनाची लागण होण्याची भीती अधिक असते. म्हणून व्हायरस शरीरावर पोहोचू नये यासाठी वारंवार हात धुणे, तसेच तोंडाला किंवा डोळ्यांना हात लावू नये असा सल्ला डॉक्टर देत आहेत. या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून नासाने खास हार तयार केला आहे. या हाराचे वैशिष्ट्य म्हणजे आपण चेहऱ्याजवळ आपले हात नेलेत. तर हा हार आपल्याला एक सिग्नल देतो. बऱ्याच वेळेस आपण चुकून तोंडाला हात लावतो, म्हणून हा हार सिग्नल देण्यासाठी बनवण्यात आला आहे.

काय आहे विशेषता?

दरम्यान हा अनोखा हार नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबने डिझाइन केला आहे. थ्री डी प्रिंटरच्या मदतीने हार बनवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. या हारात नाणे-आकाराचे डिव्हाइस आहे, ज्यामध्ये अवरक्त सेन्सर आहेत. जेव्हा आपल्या चेहऱ्याच्या 12 इंचाच्या रेंजमध्ये कोणतीही वस्तू अथवा आपले हात, किंवा इतराचे हात काहीही आले तेव्हा हा सेन्सर कंपन होण्यास सुरुवात करतो. या हाराची डिझाइन खूप रंजक बनवण्यात आली आहे. तसेच त्यामध्ये तीन व्होल्टची बॅटरी आहे.

जेट प्रोपल्शन लॅब यांच्या माहितीनुसार बनवण्यात आलेला हार कोरोनावर औषध येईपर्यंत आपण वापरु शकतो. या हाराची किंमत जास्त नसून तो सहज खरेदी करता येते. तसेच हार घालण्यात कोणतीही अडचण येत नाही. लॅबकडून तयार करण्यात आलेला हा अनोखा हार घातल्यानंतर, आपल्याला इतर बाबींची सुद्धा काळजी घ्यावी लागते. लोकांनी या हाराचा उपयोग मास्क म्हणून करू नये असं जेट प्रोपल्शन लॅबकडून सांगण्यात आलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies