नगरपलिकेकडून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक दुकानाच्या ठिकाणी चौकोनाची आखणी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिकेने अत्यावश्यक दुकानांच्या ठिकाणी तीन बाय तीनचे चौकोन तयार केले आहे.

परभणी | जगात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्याला रोखण्यासाठी सेलु नगरपालिकेने नवीन उपाय शोधला आहे. कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने अत्यावश्यक दुकानाच्या ठिकाणी चौकोनाची आखणी केली आहे. या चौकोनामध्येच उभे राहून नागरिकांनी माल खरेदी करायचा आहे. असे आवाहन नगरपालिका करण्यात आले आहे. तसेच दुकानदारांनी सुद्धा गर्दी टाळावी यासाठी लेखी पत्र सुद्धा नगरपालिकेच्या वतीने देण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिकेने अत्यावश्यक दुकानांच्या ठिकाणी तीन बाय तीनचे चौकोन तयार केले आहे. त्या चौकांमध्ये उभे राहून ग्राहकांनी आपला माल खरेदी करायचा आहे. असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले. त्याचे प्रात्यक्षिक येथील आठवडा बाजार येथे नगरपालिकाचे कर्मचाऱ्यांनी दाखवले.AM News Developed by Kalavati Technologies