सेंसेक्स 2600 अंकांनी कोसळला, इतिहासातील सर्वात मोठी घसरण

निफ्टीही 711 पॉइंटवरुन कोसलून 31 महिन्यात खालच्या स्तरावर

मुंबई | सेंसेक्समध्ये झपाट्याने घसरण होत आहे. सकाळी 11 वाजता सेंकेस्स 2600 अंकांनी कोसळला. आता सेंसेक्स 33,202.85 अंकावर व्यवसाय करत आहे. 2600 अंकांनी कोसळल्यानंतर इंट्राडे व्यवसायात सेंसेक्सची आतापर्यंत सर्वात मोठी घसरण आहे. सोमवारी सेंसेक्स इंट्राडे व्यवसायात 2467 अंकांनी कोसळला होता. निफ्टीही 701.90 अंकांनी कोसळून 9746 अंकावर पोहोचला होता. हा निफ्टीचा 31 महिन्यांचा सर्वात कमी स्तर आहे. बीएसईवर वोडाफोन आयडियाचे शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. तर स्पाइस जेट, ग्लेनमार्कच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. बीएसईवर ट्रेड होणाऱ्या 2,087 कंपन्यांच्या शेअरमधून 1873 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे.

सेंसेक्सच्या कहरामुळे बाजाराचे हाल
शेअर बाजार झपाट्याने कोसळल्याने गुंतवणुकदारांची शेअरची व्हॅल्यू जवळपास 8 लाख कोटी कमी झाली
सेंसेक्सचा मार्केट कॅप 128 लाख कोटींवर पोहोचला, बुधवारी हा 137 लाख कोटी होता
स्टॉक एक्सचेंज आकड्यांनुसार विदेशी गुंतवणुकदारांनी 3,515.38 कोटींचे शेअर विकले
बाजारात 2,087 कंपन्यांच्या शेअरमध्ये व्यवसाय होत आहे. 1873 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण
150 कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ, 8 कंपन्यांचे शेअर 52 आठवड्यात कोसळले आहेत
गुरुवारच्या व्यवसायात 33 कंपन्यांच्या शेअरमध्ये एपी सर्किट लागला तर 329 कंपन्यांच्या शेअरमध्ये लोअर सर्किटAM News Developed by Kalavati Technologies