गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी कोरोनाबाधिताच्या संपर्कात, स्वतःला केलं होम क्वारन्टाइन

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही खबरदारी घेण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली | गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्याने ते होम क्वारन्टाइन झाले आहेत. दरम्यान त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. गुजरात सरकारचे म्हणणे आहे की सीएम रुपाणी यांची तब्येत तंदुरुस्त असून ती पूर्णपणे सामान्य आहे. आता मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या घरातून काम पाहिलं.

कॉंग्रेसचे आमदार इम्रान खेडावाला यांची मुख्यमंत्री सीएम विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्याशी बैठक झाली. इम्रान खेडावाला कालच कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. यानंतर आज मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची कोरोना टेस्ट झाली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही खबरदारी घेण्यास सांगितले आहे.AM News Developed by Kalavati Technologies