औरंगाबादेत कोरोनाचा वाढता आलेख, पुन्हा 23 नव्या रुग्णांची भर

जिल्ह्यात आज दिवसभरात 191 रुग्णांची नोंद झाली आहे.

औरंगाबाद | जिल्ह्यात दुपारी 23 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये 14 पुरूष, 09 महिला आहेत. त्यामुळं कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 6 हजार 704 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एकूण 3 हजार 241 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 300 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 3163 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (22)

सौजन्य नगर (1), रेल्वे स्टेशन परिसर (5) ठाकरे नगर (1), नेहरू नगर (1), जय भवानी नगर (1), श्रीविनायक कॉलनी, मुकुंदवाडी (1), एन सहा सिडको (1) छावणी (1), मुकुंदवाडी (1), मारोती मंदिराजवळ पडेगाव (1), जय भवानी नगर, मुकुंदवाडी (1), नवयुग कॉलनी पद्मपुरी (5), बन्सीलाल नगर (1), यशोमंगल सो., खडकेश्वर (1)

ग्रामीण भागातील रुग्ण (1)

जय भवानी नगर, सिल्लोड (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.



AM News Developed by Kalavati Technologies