Corona Vaccine: रशियात नागरिकांना 'स्पुटनिक वी' या कोरोना लसीचा डोस देण्यास सुरुवात

रशियाने स्वदेशी कोरोना लसीचं संशोधन केलं असून, तेथील नागरिकांना त्या लसीचा डोस देण्यास सुरूवात झाली आहे.

डेस्क स्पेशल । जगभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. वाढती रुग्णसंख्या आता चिंतेचा विषय बनला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना या भयावह विषाणूनं जगभरात सुमारे 200 पेक्षा जास्त देशात कहर केला आहे. जगभरातील सुमारे 3.21 कोटी जणांना कोरोनाची लागण झाली असून, आतापर्यंत 9.71 लाख जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच आता कोरोनाची लस कधी येते याची सर्वांनाच आतुर्तेने प्रतिक्षा आहे. जगभरात सुमारे 170 देशात कोरोना लसीवर संशोधन सुरू असून, 26 लसींची मानवी चाचणी अंतिम टप्प्यात आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच रशियाने जगातील पहिली कोरोना लस तयार केल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर रशियाने आता त्यांच्या देशवासियांना कोरोनाची लस देण्याचं ठरवलं आहे. 'स्पुटनिक वी' असे या लसीचे नाव असून, राजधानी मास्कोत कोरोना लस नागरिकांना देण्यात आली आहे. 'स्पुटनिक वी' ही लस 'गामलेया साइंटिफिक रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी अँण्ड माइक्रोबायोलॉजी'ने विकसीत केली आहे. विशेष म्हणजे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी संयुक्त राष्ट्रातील कर्मचाऱ्यांना मोफत कोरोना लस देण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, ऑगस्टमध्ये रशियाने 'स्पुटनिक वी' या लसीचं संशोधन केलं होतं. त्यानंतर या लसीची संपुर्ण जगात चर्चा सुरू झाली आहे. तसेच ही लस रशियातील नागरिकांना देण्यात आली असून, कोरोनाला हरवण्यासाठी हि लस संजीवनी ठरत आहे. जगभरात ही लस लवकरात-लवकर उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न रशियाचे सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies