कोरोना लस : सीरम इंस्टिट्युटसोबत बिल गेट्स यांचा मोठा करार; 10 कोटी गरीबांना मोफत कोरोना लस देणार

भारतासह जगभरातील गरीबांना कोरोनाची लस उपलब्ध करून देण्यासाठी; बिल गेट्स आणि मलिंडा गेस्ट फाउंडेशनचा पुण्यातील सीरम इंस्टिट्युट सोबत करार

नवी दिल्ली । कोरोना विषाणूने जगभरात धुमाकुळ घातला आहे. आतापर्यंत अनेकांना या आजाराने ग्रासलं आहे. तसेच बऱ्याच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिवसेंदिवस वाढणारी रूग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनत चालला आहे. अशातच कोरोनावर मात करणारी लस कधी येणार यावर सर्वांचेच लक्ष लागले आहे. जगातील बहुतांश देश कोरोनालसीवर संशोधन करत असून, लस कधी येणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. दिलासादायक बाब म्हणजे ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि पुण्यातील सीरम इंस्टिट्युटने कोरोनावर मात करणारी लस तयार केली आहे.

दरम्यान, कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यावर ती गरीबांपर्यंत पोहोचावी. यासाठी बिल गेट्स आणि भारतातील सीरम इंस्टीट्युटने पुढाकार घेतला आहे. भारतासह इतर देशातील गरीबांना कोरोनाची लस उपलब्ध करून देण्यासाठी सीरम इंस्टीट्युट आणि बिल व मलिंडा गेट्स फाउंडेशनने सीरम इंस्टीट्युट सोबत करार केला आहे. या करारानुसार 10 कोटी लस गरीबांना उपलब्ध करून देणार आहे.

भारतातील सीरम इंस्टिट्युट ही जगातील नामवंत मेडिकल इंस्टिट्युट पैकी एक आहे. म्हणून ऑक्सफोर्ड विद्यापीठाने सुद्धा कोरोनावरील लस बनवण्यासाठी सीरमसोबत करार केला होता. पूनावाला यांनी काही दिवसांपुर्वीच भारतीयांना ही कोरोनाची लस माफक दरात उपलब्ध करून देण्यात येईल असे स्पष्ट केले होते.AM News Developed by Kalavati Technologies