खुशखबर! अवघ्या 250 रुपयांत मिळणार कोरोनावरची लस, सिरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत

कोरोनावरची लस भारतात आणण्यासाठी सिरम संस्था, GAVI आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत.

मुंबई | जगभरात सध्या कोरोना व्हायरने मोठं थैमान घातलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोनाला आळा घालण्यासाठी कोरोनावर लवकरात लवकर लस तयार व्हावी यासाठी अनेक देशांमध्ये प्रयत्न सुरु आहेत. पुण्यातली सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या मदतीने लस आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ही लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि सामान्य लोकांना परवडणारी असावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे. फक्त भारतातच नाही तर जगातल्या देशांमध्ये असलेल्या गरीबांना ही लस उपलब्ध करण्याचा भारताचा मानस आहे. त्या दृष्टीने आता पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटने आणखी एक पाऊल उचललं आहे.

कोरोनावरची लस भारतात आणण्यासाठी सिरम संस्था, GAVI आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन कोरोना लसीसाठी 150 मिलियन डॉलर्सचा निधी दिला जाणार असल्याची माहिती आहे. कोरोनावर उपलब्ध होणाऱ्या या लसीची जास्तीत जास्त किंमत 3 यूएस डॉलर्स म्हणजे साधारण 225 ते 250 रुपयांच्या घरात असेल अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटने दिली आहे. एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया कंपनीला रोगप्रतिकारक औषध निर्मिती करणारी कंपनी म्हणून ओळखले जाते. इतकचं नाही तर जगातली एक उत्तम संस्था असा या संस्थेचा लौकिक आहे.AM News Developed by Kalavati Technologies