Corona Updates; औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 17 नवे रुग्ण, तीन जणांचा मृत्यू

जिल्ह्यात दुपारनंतर 17 जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

औरंगाबाद | जिल्ह्यातील 17 रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 13 हजार 679 झाली आहे. यापमध्ये 467 जणांचा मृत्यु झालाय. तर आतापर्यंत 9 हजार 680 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर 3 हजार 532 जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नव्याने पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)

मनपा (17)

बन्सीलाल नगर (2), बाजीप्रभू चौक, गजानन नगर (1), सुराणा नगर (1), जवाहर कॉलनी (2), वेदांत नगर (4), एन दोन सिडको (1), मयूर नगर, हडको (1), अन्य (1), एन नऊ हडको (1), आंबेडकर नगर (1), झांबड इस्टेट परिसर (1), सुराणा नगर (1)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत विश्रांती नगरातील 46 वर्षीय पुरूष, अविष्कार कॉलनी, एन सहा, सिडकोतील 79 वर्षीय पुरूष आणि खोकडपुऱ्यातील 76 वर्षीया महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.AM News Developed by Kalavati Technologies