दिलासादायक! देशात कोरोनाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासात 46,790 जणांना कोरोनाची लागण

देशात कोरोना रुग्ण सक्रिय होण्याचे प्रमाण मंदावले असून, गेल्या 24 तासात 46,790 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा वेग काही प्रमाणात मंदावला आहे. देशात गेल्या 24 तासात 46 हजार 790 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 587 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशात आतापर्यंत सुमारे 75 लाखांना ग्रासलं आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 67 लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 46 हजार 790 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 587 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 7 लाख 45 हजार 538 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण हा 75 लाख 97 हजार 64 एवढा झाला आहे. उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाख 15 हजार 197 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 67 लाख 33 हजार 329 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies