कोरोना अपडेट | नागपूरात गेल्या 24 तासात 540 जणांना कोरोनाची बाधा, तर 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 2925 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 90 हजारांच्या पार गेला आहे

नागपूर । नागपूरात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 540 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 90 हजार 301 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 26 हजार 733 रुग्णांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 2 हजार 925 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 80 हजार 643 जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना रुग्णालयातून सुखरूप घरी सोडण्यात आले आहे. आज आढळलेल्या 540 रुग्णांपैकी ग्रामीण भागातील 164 तर शहरी भागातील 369 जणांचा समावेश आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे नागपूरकरांच्या चिंतेत आणखीणच भर पडली आहे.AM News Developed by Kalavati Technologies