कोरोना अपडेट | सांगलीत आज 393 कोरोनाबाधितांची भर, तर 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 6,609 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 38,518 एवढा झाला आहे

सांगली । सांगलीत कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. आज जिल्ह्यात 393 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 19 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 38 हजार 518 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 6 हजार 609 जणांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 हजार 403 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 30 हजार 506 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगली शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे सांगलीकरांच्या चिंतेत आणखीणच भर पडली आहे.AM News Developed by Kalavati Technologies