Corona Update : परभणीत पुन्हा 82 जणांना कोरोनाची लागण

आजपर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ; रुग्णसंख्या पोहोचली 915 वर

परभणी । परभणी शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल 82 जण कोरोनाबाधित आढळले असुन, आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णाची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे.  शुक्रवारी आलेल्या अहवालात परभणी शहरातील एकूण 43 व्यक्ती कोरोनाबाधित आढळले असुन, परभणी तालुक्यातील 19, जिंतूर तालुक्यातील 1, पूर्णेतील 6, गंगाखेड शहरातील 6, गंगाखेड ग्रामीण मधील 2, सेलू तालुक्यातील 2, मानवत शहरातील 2, पालम तालुक्यातील 1 अशा एकूण 26 महिला व 56 पुरूष अशा 82 व्यक्ती कोरोनाबाधित झाले आहेत.

संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या 915 एवढी झाली असून, 440 जणांना उपचारानंतर घरी पाठवले आहे सध्या रुग्णालयात 427 रुग्ण उपचार घेत असून 48 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies