Corona Update : औरंगाबाद शहरात कोरोनाचा वेग मंदावला; मात्र ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच

जिल्ह्यात आज 71 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, त्यामध्ये ग्रामीण भागातील 41 तर मनपा हद्दीतील 30 रुग्णांचा समावेश आहे

औरंगाबाद । औरंगाबाद जिल्ह्यातील 71 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात 13440 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 9338 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 462 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 3640 जणांवर उपचार सुरु आहेत.
ग्रामीण भागातील अँटीजनचाचणीद्वारे आढळलेल्या 38 रुग्णांचा समावेश आहे. रुग्णांचा जिल्ह्यातील भागांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

ग्रामीण (41)

पाचोड,पैठण (2), नूतन कॉलनी, गंगापूर (1), औरंगाबाद (9), फुलंब्री (1), सिल्लोड (2), वैजापूर (15), पैठण (7), सोयगाव (4)

मनपा (30)

बैजिलाल नगर (1), सिडको परिसर (1), मुकुंदवाडी (1), जवाहर कॉलनी (1) पंचशील नगर (2), रोशन सो., गारखेडा (1), उल्कानगरी (4), एन सहा सिडको (6), संघर्ष नगर, मुकुंदवाडी (3), सिद्धार्थ नगर (5), गवळीपुरा (1), राम नगर (1), एन सात, अयोध्या नगर (1), गारखेडा परिसर (2)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

खासगी रुग्णालयांत सिल्लोड तालुक्यातील समता नगर, शिक्षक कॉलनीतील 58 वर्षीय पुरूष, औरंगाबाद शहरातील कैसर कॉलनीतील 59 वर्षीय पुरूष, रोशन गेट येथील 70 वर्षीय पुरूष आणि फाजलपु-यातील 46 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान काल एकूण 117 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली होती.



AM News Developed by Kalavati Technologies