Corona Update : औरंगाबाद शहरात कोरोनाचा वेग मंदावला; मात्र ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच..

जिल्ह्याची रुग्णसंख्या पोहोचली 13104 वर, सध्या 4125 जणांवर उपचार सुरू

औरंगाबाद । औरंगाबाद जिल्ह्यातील 66 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 13104 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 8536 रूग्ण बरे झाले असुन, 443 जणांचा मृत्यू झाला. तर 4125 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. यामध्ये अँटीजेनद्वारे केलेल्या तपासणीतील ग्रामीण भागातील 40 रुग्णांचा समावेश आहे. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

ग्रामीण भागातील रुग्ण (43)

संतपूर, कन्नड (1), पाचोड (1), बजाज नगर (1), औरंगाबाद (3), गंगापूर (9), सिल्लोड (6), वैजापूर (21), पैठण (1)

मनपा हद्दीतील रुग्ण (23)

गारखेडा (1), चिकलठाणा (1), उल्कानगरी (1), पडेगाव (2), राम नगर (1), एसटी कॉलनी (2) पंचशील नगर (2), नारेगाव (2), किर्ती सो., एन आठ (1), ज्ञानेश्वर कॉलनी, गारखेडा (1), मुकुंदवाडी (6), जय भवानी नगर (2), एन दोन सिडको (1)AM News Developed by Kalavati Technologies