सातारा । सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात 875 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झाले आहे. तर 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 17 हजार 663 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात सध्या 7 हजार 427 रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत उपचारादरम्यान सुमारे 462 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 9 हजार 774 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे. साताऱ्यात गेल्या काही दिवसांपासून रोजच शेकडोंच्या संख्येने रुग्णवाढ होत असल्याने साताराकरांच्या चिंतेच आणखीणच भर पडली आहे.
कोरोना अपडेट : साताऱ्यात गेल्या 24 तासात 875 जणांना कोरोनाची बाधा
जिल्ह्यात सध्या 7 हजार 427 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 17 हजार 663 इतका झाला आहे
