कोरोना अपडेट | नागपूर गेल्या 24 तासात 994 जणांना कोरोनाची लागण, तर 38 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात सध्या 13,680 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 75 हजारांच्या पार गेला आहे

नागपूर । नागपूरात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. गेल्या 24 तासात 994 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 75 हजार 813 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 13 हजार 680 रुग्णांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 2 हजार 438 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 59 हजार 697 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे. आज आढळलेल्या 994 रुग्णांपैकी ग्रामीण भागातील 247 तर शहरी भागातील 743 जणांचा समावेश आहे. नागपूरात गेल्या काही दिवसांपासून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना कहर कायम आहे. कोरोनाने जिल्ह्यातील गावा-गावात प्रवेश केला आहे. जिल्ह्यात रोजच शेकडोंनी वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनत चालला आहे.



AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: