कोरोना अपडेट | नागपूरात गेल्या 24 तासात 982 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 13 हजार 35 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 78 हजारांच्या पार गेला आहे

नागपूर । नागपूरात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 982 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 38 जणांचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 78 हजार 12 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 13 हजार 35 रुग्णांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 2 हजार 510 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक म्हणजे उपचारानंतर आतापर्यंत सुमारे 62 हजार 467 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आज आढळलेल्या 982 रुग्णांपैकी ग्रामीण भागातील 258 तर शहरी भागातील 722 रुग्णांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 2 हजार 510 जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 245 मृत्यू हे ग्रामीण भागातील आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरासह जिल्ह्यातही कोरोनाचा कहर सुरूच आहे. रोजच जिल्ह्यात हजारोंनी वाढणारी रुग्णसंख्या हा आता नागपूरकरांच्या चिंतेचा विषय बनला आहे.

हेही वाचा: Unlock India : देशात आजपासून अनलॉक 5 ला सुरूवात..; जाणून घ्या काय राहणार सुरू आणि काय राहणार बंदAM News Developed by Kalavati Technologies