कोरोना अपडेट | सोलापूरात गेल्या 24 तासात 483 जणांना कोरोनाची लागण, तर 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 7 हजार 157 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 32 हजार 295 एवढा झाला आहे

सोलापूर । सोलापूरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासात 483 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 32 हजार 295 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 7 हजार 157 जणांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 हजार 126 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 54 हजार 12 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, रोजच जिल्ह्यात शेकडोंच्या संख्येने रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे.AM News Developed by Kalavati Technologies