Corona Update : कल्याण-डोंबिवलीत 24 तासात 209 जणांना कोरोनाची लागण

सध्या कल्याण-डोंबिवलीत 4743 रुग्णांवर उपचार सुरू; तर 16452 जणांनी केली कोरोनावर मात

कल्याण । कल्याण-डोंबिवली शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासात तब्बल 209 रुग्णांची भर पडली आहे. तर आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली शहरात कोरोनाबाधितांचा आकडा हा 21,607 वर पोहोचला आहे. तर आतापर्यत 16,452 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 4743 जणांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 412 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : पालघरमध्ये आज कोरोनाचे 263 नवे रुग्ण, दिवसभरात 9 जणांचा मृत्यूAM News Developed by Kalavati Technologies