कोरोना अपडेट | कल्याण-डोंबिवलीत गेल्या 24 तासात 350 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या 24 तासात 350 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे

कल्याण । कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासात पुन्हा 350 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा आता 41 हजार 467 एवढा झाला आहे. सध्या कल्याण-डोंबिवली परिसरात 4 हजार 275 जणांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 812 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 36 हजार 479 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली परिसरात कोरोनाचा कहर कायमच आहे. रोजच सुमारे शेकडोंच्या संख्येने कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे.AM News Developed by Kalavati Technologies