कोरोना अपडेट | साताऱ्यात आज 706 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांचा आकडा 32 हजारांच्या पार

सध्या जिल्ह्यात 9,657 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आतापर्यंत 940 जणांचा मृत्यू झाला आहे

सातारा । सातारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. आज पुन्हा 706 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून, 34 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 32 हजार 222 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 9 हजार 657 जणांवर उपचार सुरू आहे. तर कोरोनामुळे उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 940 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 21 हजार 625 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 64 हजार 640 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहे. गेल्या काही दिवसांपासून, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे साताराकरांच्या चिंतेत आणखीणच भर पडली आहे.AM News Developed by Kalavati Technologies