[email protected] : औरंगाबादेत आज 151 कोरोनाबाधितांची भर, तर 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 1287 रुग्णांवर उपचार सुरु असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 37,376 एवढा झाला आहे

औरंगाबाद । औरंगाबादेत कोरोनाचा वेग काही प्रमाणात मंदावला असून आज जिल्ह्यात 151 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 37 हजार 376 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 1 हजार 287 रुग्णांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 हजार 53 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 35 हजार 36 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आज अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मनपाकडून 24 आणि ग्रामीण भागात 42 रुग्ण आढळलेले आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (77)

वाळूज एमआयडीसी (1), खामगाव, फुलंब्री (1), कन्नड (6), शरद पवार कॉलनी, कन्नड (1), चिकलठाण, कन्नड (5), वाकी, कन्नड (6), गणेश चौक, वाळूज (1), जानेफळ, वैजापूर (1), नायगाव (1) भोकरगाव, वैजापूर (2), नादरपूर, कन्नड (1), बजाज नगर (1), गंगापूर (4), जांभरगाव, वैजापूर (2), पैठण (6), साठे नगर, कन्नड (1), गणेशपूर फुलंब्री (1), औरंगाबाद (2), खुलताबाद (2), वैजापूर (32)

मनपा (50)

राधा स्वामी कॉलनी (1), श्रीकृष्ण नगर (4), एन पाच सिडको (3), एन सात (1), एन नऊ (1), नागेश्वरवाडी (1), पडेगाव (1), छत्रपती नगर (1), प्रताप नगर (1), सिंधी कॉलनी (1), भोईवाडा (2), धनगर वाडा , हर्सुल (1), नारेगाव (1), शिवनेरी कॉलनी (1), संग्राम नगर (1), शुभम कॉलनी (1), संभाजी कॉलनी (1), राज नगर (2), गणेश नगर (1), एन चार सिडको (1), राजीव गांधी नगर (1), राम नगर (1), गारखेडा परिसर (3), समर्थ नगर (1), रोजाबाग (1), बीड बायपास (1), इटखेडा (1), स्वप्ननगरी (3), टीव्ही सेंटर (1), कांचनवाडी (1), काल्डा कॉर्नर (2), वेदांत नगर (1), जवाहर कॉलनी (1), पारिजात नगर, सिडको (1), पवन नगर (1), पहाडसिंगपुरा (1), मुकुंदवाडी (1), मिलिट्री हॉस्पीटल (1)

पाच कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत समर्थ नगरातील 72 वर्षीय पुरूष, लोहगाव, पैठण येथील 57 वर्षीय स्त्री, एकता नगर, हर्सुलमधील 61 वर्षीय पुरूष, लेबर कॉलनीतील 40 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयात टिळक नगरातील 89 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.



AM News Developed by Kalavati Technologies