Corona In Thane : ठाण्यात आज 233 रुग्णांची भर; रुग्णसंख्या पोहोचली 19776 वर

सध्या 3883 जणांवर उपचार सुरू, तर आतापर्यंत 638 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यु

ठाणे । देशासह राज्यातही कोरोनाने थैमान घातलं आहे. मुंबई शहरासह ठाण्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आज ठाण्यात पुन्हा 233 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे ठाण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 19776 वर गेला आहे. सध्या शहरात 3883 जणांवर उपचार सुरू असुन, 15255 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर आतापर्यंत 638 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यु झाला आहे. त्यात आज पुन्हा 4 रुग्णांचा कोरोनाने जीव घेतला आहे.AM News Developed by Kalavati Technologies