Corona In India : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 62 लाखांच्या पार, आतापर्यंत 97 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून, गेल्या 24 तासात 80,472 जणांचा कोरोना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं जगभरात सुमारे 62 लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. तर उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 97 हजार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 52 लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे.  केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 80 हजार 472 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 1 हजार 179 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 62 लाख 25 हजार 764 एवढा झाला असून, उपचारादरम्यान कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे 97 हजार 497 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 51 लाख 87 हजार 826 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे.

दरम्यान, जगभरात सुमारे 200 पेक्षा जास्त देशात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 3 कोटी 34 लाख एवढा झाला आहे. तर आतापर्यंत 10 लाख 2 हजार जणांचा कोरोनाने जीव घेतला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत 2 कोटी 32 लाख जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जागतिक आकडेवारीमध्ये अमेरिका अव्वल स्थानी असून, त्यापाठोपाठ भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 62 लाखांच्या पार गेला आहे.



AM News Developed by Kalavati Technologies