कोरोना अपडेट । सांगलीत आज 749 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 हजारांच्या पार

सध्या जिल्ह्यात 9 हजार 33 रुग्णांवर उपचार सुरू असून, 14 हजार 824 जणांनी कोरोनावर मात केली आहे

सांगली । सांगलीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. आज जिल्ह्यात तब्बल 749 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 21 हजार 788 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 9 हजार 33 रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत कोरोनामुळे सुमारे 931 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 14 हजार 824 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून वाढती रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनत चालला आहे.AM News Developed by Kalavati Technologies