Corona Update : सोलापूरात पुन्हा 251 रुग्णांची भर; रुग्णसंख्या पोहोचली 9491 वर

सध्या जिल्ह्यात 3048 जणांवर उपचार सुरू असुन, 5949 जणांनी कोरोनावर मात केली आहे

सोलापूर । सोलापूरात कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 251 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सोलापूरात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 9 हजार 491 वर पोहोचली आहे. सध्या 3048 जणांवर उपचार सुरू असून, 5949 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर गेल्या 24 तासात पुन्हा 7 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा हा 494 वर पोहोचला आहे.AM News Developed by Kalavati Technologies