Corona Update : औरंगाबादेत आज पुन्हा 15 रुग्णांची वाढ; रुग्णसंख्या पोहोचली 17 हजार 427 वर

सध्या जिल्ह्यात 4 हजार 29 रुग्णांवर उपचार सुरू असुन, 12 हजार 833 जणांनी कोरोनावर मात केली आहे

औरंगाबाद । औरंगाबाद जिल्ह्यातील 15 रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 17 हजार 427 एवढी झाली आहे. त्यापैकी 12 हजार 833 रुग्ण बरे झाले आहेत. तर 565 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याने सध्या 4 हजार 29 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

ग्रामीण (08)

कन्नड (1), पैठण (1), फुलंब्री (2), गंगापूर (1), वैजापूर (1), शाहू कॉलनी, सिल्लोड (1), राजर्षी शाहू नगर,सिल्लोड (1)

मनपा (07)

छावणी (1), फुले नगर (1), नक्षत्रवाडी (1), बौद्धवाडा (1), एन तीन हडको (1), बाळापूर फाटा (1), उल्का नगर, गारखेडा परिसर (1),

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत खडकेश्वर येथील 59 वर्षीय स्त्री, रांजणगावातील जय भवानी चौक परिसरातील 55, सिल्लोड तालुक्यातील शास्त्री नगरातील 62 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.AM News Developed by Kalavati Technologies