Corona Update : नागपूरात कोरोनाचा उद्रेक सुरूच; आज पुन्हा 604 जणांना कोरोनाची लागण

सध्या नागपूरात 2 हजार 711 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाबाधितांचा आकडा 9 हजार 384 वर पोहोचला आहे

नागपूर । नागपूरात कोरोनाचा उद्रेक वाढतच चालला आहे. आज दिवसभरात 604 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामीणमध्ये 150 तर शहरी भागात 454 रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून नागपूरात कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढतच आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 9 हजार 384 एवढी झाली आहे. तर आतापर्यंत 4 हजार 869 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सोबतच आज 19 कोरोनाबाधित रुग्णांचा नागपूरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण मृत्यूसंख्या 334 झाली आहे, यापैकी 49 जणांचा मृत्यू हे नागपूर जिल्ह्याबाहेरचे आहेत. सध्या नागपूरात 2 हजार 711 रुग्णांवर उपचार सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies