कोरोना अपडेट | सांगलीत आज 690 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; तर 33 जणांचा मृत्यू

सांगलीत कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून, आज 690 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

सांगली। सांगलीत कोरोनाचा उद्रेक कायम आहे. जिल्ह्यात आज 690 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 33 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 30 हजार 22 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 9 हजार 223 जणांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 हजार 135 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 19 हजार 664 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगलीत रोजच हजारोंच्या संख्येने रुग्णवाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्या हा आता सांगंलीकरांचा चिंतेचा विषय बनला आहे.



AM News Developed by Kalavati Technologies