कोरोना अपडेट | साताऱ्यात आज 557 जणांना कोरोनाची लागण; तर 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 8 हजार 103 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 30 हजारांच्या पार गेला आहे.

सातारा । साताऱ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. जिल्ह्यात आज 557 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 30 हजार 787 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 8 हजार 103 जणांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1093 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 21 हजार 591 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत असून, वाढती रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे.AM News Developed by Kalavati Technologies